Sports News : चीन : एशियन फेन्सिंग चॅम्पियशिपमध्ये यापूर्वी भारताच्या कोणत्याही फेन्सिंगपटूला पदक पटकावता आले नव्हते. हा इतिहास भारताची ऑलिम्पिकपटू भवानी देवीने रचला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने सेमी फायनल गाठली आहे.
अवघा 1 गुण कमी पडला
उपांत्य फेरीत पराभव पत्करल्यावरही कांस्य पदक निश्चित केले आहे. (Sports News) फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव राजीव मेहता यांनी भवानी देवीचं अभिनंदन केलं आहे. आशियाई तलवारबाजीत आजवर भारताच्या एकाही खेळाडूला पदक मिळवता आलेले नव्हते. भवानी देवीने झायनाबला सेमी फायनलमध्ये कडवी टक्कर दिली. मात्र भवानी देवीला अवघा 1 गुण कमी पडला.
भवानी देवीने जपानची गतवेळची वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी इमुराचा क्वार्टर फायनलमध्ये 15 – 10 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. (Sports News) मात्र सेमी फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या झायनाब दायिबेकोव्हाने भवानी देवीचा 14 – 15 असा पराभव केल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; 31 ऑगस्टपासून होणार सुरुवात
Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड