Sports News | पुणे : खराडी गावातील सालाबाद प्रमाणे श्री काळभैरवनाथ देवाचा ऊरुस मोठ्या उत्साहात साजर होत आहे. यानिमित्ताने गावात जंगी कुस्त्यांचा Sports News आखाडा रंगणार आहे. या कुस्त्या बुधवारी (ता.15) दुपारी 12 वाजता कै. राजाराम भिकू पठारे पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कै. विठोबा मारुती पठारे इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहेत. अशी माहिती आखाडाप्रमुख आणि माजी नगरसेवक महादेव पठारे पाटील यांनी दिली.
या आखाड्यात देशपातळीवरील नामांकित मल्ल सहभागी होणार असून ग्रामस्थांच्या वतीने एकूण 28 लाख रुपयांची रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे आखाडा चांगलाच रंगणार आहे.
भारत केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै. बिनिया जम्मू…
प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै. बिनिया (जम्मू ) यांच्यात होईल. द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर, तृतीय क्रमांक कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पै. विशाल, चतुर्थ क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश केसरी आर्यन प्रताप विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पै. माऊली कोकाटे आणि पाचव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफिक विरुद्ध राष्ट्रीय विजेता पै. सागर बिराजदार यांच्यात होणार आहे. याशिवाय पृथ्वीराज मोहोळ, तुषार डुबे, शुभम शिदनाळे आदी नामांकित मल्लांच्या सुमारे 70 कुस्त्या होणार आहेत.
कुस्ती आखाड्याचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. बबन पठारे पाटील, कुस्ती प्रशिक्षक विलास कंडरे, ट्रस्टचे अध्यक्ष राहुल पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, युवा नेते सुरेंद्र पठारे, बाळासाहेब राजगुरू, गुलाब पठारे, नवनाथ पठारे, बापू पठारे, दिलीप पाटील यांसह भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने या स्पर्धेचे नियोजन केले आहे. कुस्ती शौकिनांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
नागराज मंजुळे बनविणार “कुस्तीपटू खाशाबा जाधव” यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
Breaking News : उच्च न्यायालयाचा निर्णय : महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्य कुस्तीगीर परिषदच घेणार