Sports News : मुंबई : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची बांधणी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली.
बीसीसीआयने दिली माहिती
दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. बॅकअप म्हणून संजू सॅमसन याला ठेवण्यात आले असून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना स्थान मिळाले आहे. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. (Sports News) आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आय मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती सिद्ध झाल्याने बुमराहने आशिया चषकाच्या संघात स्वतःची जागा निश्चित केली आहे.
रोहित शर्माने पत्रकार परिषदेत निवडीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या संघात युझवेन्द्र चहल याला डच्चू देण्यात आला आहे. (Sports News) याबाबत रोहित शर्मा याने सांगितले की, एकाच वेळी दोन रिस्ट स्पिनर्सची आवश्यकता नव्हती आणि समीकरण पाहिल्यास सध्या कुलदीप चहलच्या पुढे आहे, त्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
येत्या ३० ऑगस्टपासून आशिया चषक २०२३ खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. (Sports News) पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात समावेश आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका ब गटात आहेत
आशिया चषक २०२३ भारतीय संघात कोणाचा समावेश?
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : बेसबॉल कर्णधार रेश्मा पुणेकरचा अग्निपंख फाउंडेशनतर्फे यथोचित सन्मान
Sports News : टीम इंडियाला मोठा दिलासा; क्रिकेटपटू श्रेयस अय्यर तंदुरुस्त, आता…
Sports News : 2036 मध्ये भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणार; क्रीडामंत्र्यांनी आखली योजना..