Sports News : मुंबई : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेला 31 ऑगस्टला सुरुवात होणार असून, अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे.
आशिया कपचे श्रीलंकेत 9 सामने होणार आहेत. तर पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 31 ऑगस्टला सुरुवात होणार असून, अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. (Sports News) आशिया चषक हा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक ही सर्व आशियाई संघांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही खेळणार आहेत.
सुपर – 4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत
ही स्पर्धा दोन गटात होणार असल्याची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेने दिली. दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत खेळतील, असे सांगितले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : टीम इंडियाच्या नवीन ‘जर्सी’चं अनावरण
Pimpri News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी समिता राजेंद्र गोरे