Sport News लोणी काळभोर : आगामी काळात चीनमधील हांगझोऊ शहरात होणा-या १९ व्या आशियाई स्पर्धेत स्केटिंग खेळात सहभागी होणा-या भारतीय संघात महाराष्ट्राच्या दहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. (Sport News) यामध्ये पुण्यातील दोन सख्ख्या भावांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. (Sport News)
२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १९ वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ या चीनमधील शहरात होणार आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील १० स्केटर्सची निवड झाली आहे. अंतिम निवड चाचणी मोहाली पंजाब येथे २४ जून रोजी पार पडली. तर २८ जून २०२३ नंतर प्रशिक्षण शिबिर पार पडले.
दरम्यान, भारताच्या विविध भागातून एकूण २९ स्केटर्सची निवड करण्यात आली असून, संघात महाराष्ट्राच्या सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे. यातील विश्वेश व यशोधन पाटील हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
स्केटर्सची नावे पुढीलप्रमाणे –
विक्रम इंगळे – स्पीड स्केटिंग
सिद्धांत कांबळे – स्पीड स्केटिंग
जिनेश नानल – इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
विश्वेश पाटील – इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
श्रेयसी जोशी – इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
स्वराली जोशी – इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
यशवी शाह – कलात्मक स्केटिंग
राहुल एलुरी – कलात्मक स्केटिंग
यशोधन पाटील – स्केटबोर्डिंग
उर्मिला पाबळे – स्केटबोर्डिंग