IND vs SA: पार्ल (दक्षिण आफ्रिका): तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. रजत पाटीदार भारतासाठी पदार्पण करत आहे. याशिवाय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे पुनरागमन झाले आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे खेळत नाहीये. याशिवाय कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन-
संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, टिळक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन-
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (सी), हेनरिक क्लासेन (वि.), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरॉन हेन्ड्रिक्स.
टॉसनंतर टीम इंडियाचा कर्णधार काय म्हणाला?
नाणेफेकझाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्यास अस्वस्थ नाही. ही विकेट दोन्ही डावात जवळपास सारखीच असणार आहे, खेळपट्टीच्या स्वरुपात फारसा बदल होणार नाही. तो म्हणाला की, गेल्या सामन्यात आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण सुमारे 40 धावांच्या आत आमचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. आमच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली तर त्यांना त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करावे लागेल. माझ्या मते ही विकेट गेल्या सामन्यापेक्षा चांगली विकेट आहे.
केएल राहुल म्हणाला की, रजत पाटीदार भारतासाठी वनडे पदार्पण करत आहे. त्याचवेळी ऋतुराज गायकवाड प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. तसेच कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.