पुणे : एएवाय’एस (आईज) सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे आयोजन १० व ११ डिसेंबर दरम्यान स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे १६ वे वर्ष असून सॉफ्टबॉल खेळाच्या प्राचारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील लढती सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होतील अशी माहिती एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे व सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.
स्पर्धा साखळी व नॉक-आउट या प्रकारात घेतली जाणार असून या स्पर्धेमध्ये १२ संघ खेळणार आहेत. यात पुणे येथील २ संघ, जळगाव, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, संगमनेर व नागपूर हे १२ संघ सहभागी होणार असून सुमारे १८० खेळाडू सहभागी होणार आहेत.
सहभागी खेळाडू उत्तम केटरर्स, योहान पूनावाला फाउंडेशन, महलक्ष्मी ग्रुप, बढेकर ग्रुप, एसके ग्रुप, पंडित जावडेकर, सार्थक कॉर्पोरेशन, अमनोरा, गोखले कन्स्ट्रक्शन, मोहर, श्लोक इन्सुलेशन, जीबी इन्फ्रा या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन भारत देसडला, दत्तात्रय गोटे, सुनील चव्हाण, नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.