पुणे : हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने कारकिर्दीतील आपले पहिलवहिले शतक केले. ९७ चेंडूत १३० धावांची खेळी केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १३० धावा केल्या. त्याच्याशिवाय इशान किशनने ५०, धवनने ४० आणि कर्णधार राहुलने ३० धावा केल्या.
A brilliant CENTURY for @ShubmanGill ????????
His maiden ???? in international cricket.
Well played, Shubman ????????#ZIMvIND pic.twitter.com/98WG22gpxV
— BCCI (@BCCI) August 22, 2022
केएल राहुल ३० धावा करून बाद झाल्यानंतर शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच झटपट धावा केल्या. ८२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. शुबमन गिल आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली.
वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या. याशिवाय, २०२०-२१मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात तो ९१ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय अद्याप क्रिकेटमध्ये शतक झाले नव्हते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली.