कोलकाता : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली हे आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी देखील सौरभ गांगुली यांनी सन २०१९ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे मार्गदर्शक म्हणून कार्यभार सांभाळला होता. मात्र, आता पुन्हा सौरभ गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागमन करण्यात येणार असल्याने दिल्ली संघात आनंदाचे वातावरण आहे.
सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दिल्ली संघाचे मार्गदर्शक पद सोडले होते. गेल्या वर्षी बीसीसीआय पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्या नंतर रॉजर बिन्नी यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले होते. यापूर्वी सौरभ गांगुलीने कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया या दोन संघाचे कर्णधारपद सांभाळले होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुली हे दिल्ली कॅपिटल्सच्या बरोबरीने दक्षिण आफ्रिकेच्या टी २० लीग मधील दुबई कॅपिटल्स व प्रिटोरिया कॅपिटल्स या दोन संघाचे मार्गदर्शक म्हणून देखील कार्यभार सांभाळणार आहेत.
दिल्ली संघातील पुनरागमनामुळे दिल्ली संघात आनंदाचे वातावरण आहे. सौरभ गांगुलीनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय तसेच टी २० या तीनही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच अनेक महत्वाच्या स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच त्यांना संस्थात्मक कार्यपद्धतीचा देखील अनुभव असल्याने हा अनुभव दिल्ली संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुढील प्रमाणे
ऋषभ पंत (कर्णधार) , डेव्हिड वॉर्नर (उप कर्णधार) , पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.