Sanjay Datt Cricket News, मुंबई : बॉलिवूड कलाकार केवळ कला क्षेत्रातच आपले नशीब आजमावत नाही तर अनेक व्यवसायांत गुंतवणूक करण्यालाही नेहमीच प्राधान्य देतात. (Sanjay Datt Cricket News) शाहरुख खान, प्रिती झिंटानंतर आता बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनेही क्रिकेट विश्वात एन्ट्री केली आहे. आता संजय दत्तही क्रिकेट टीम विकत घेत या फिल्मस्टार, उद्योजकांच्या यादीत आला आहे. (Sanjay Datt Cricket News)
संजय दत्तची टीमही खेळणार
झिम्बाब्वे जिम आफ्रो ‘टी१०’ स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा २० जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत संजय दत्तची टीमही खेळणार आहे. ‘एरीज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संस्थापक, अध्यक्ष व सीईओ सोहन रॉय यांच्यासह संजय ‘हरिकेन्स’ संघाचा सहमालक बनला आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने ‘झिम्बाब्वे जिम आफ्रो ‘टी१०’ या स्पर्धेचे आयोजन केले असून यात ५ संघ खेळणार आहे. ज्यात डरबन कलंदर्स, जोबर्ग लायन्स, केपटाऊन सैम्प, बुलावायो ब्रेव्स आणि हरारे हरिकेन्स हे संघ आहेत. या स्पर्धेत डरबन कलंदर्स हा संघ पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचाइजी लाहौर कलंदर्सच्या मालकीची आहे.
नुकतंच याआधी संजय दत्तने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. मुंबईतील स्टार्टअप कार्टेल अँड ब्रदर्स ही कंपनी त्यांचा दारुचा ब्रँड भारतात विक्री करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीत संजय दत्तने गुंतवणूक केली आहे. तसेच यापूर्वी संजय दत्त याने सायबर मेडिया इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती.