पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्यानंतर तिसरे लग्न केले. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत शोएबने लग्न केले. गेल्या दोन वर्षांपासून शोएब आणि सानियाचे संबंध चांगले नव्हते. दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे, कोणाकडे जास्त संपत्ती आहे ते जाणून घेऊयात.
दोघेही मोठे स्पोर्ट्स स्टार असल्याने दोघांकडेही अफाट संपत्ती आहे. घटस्फोटानंतर या मालमत्तेचे विभाजन कसे झाले किंवा कसे होईल? हे नंतर कळेल. मात्र, अशा काही मालमत्ता आहेत ज्या आधीपासून त्या दोघांच्या स्वतंत्रपणे मालकीच्या आहेत.
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती किती?
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये आहे. खेळासोबतच सानिया एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. आता ती खेळात फारशी सक्रिय नाही पण तरीही ती टेनिसमधून वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये कमवते. ब्रँडच्या जाहिरातींमुळे तिचे वार्षिक उत्पन्नही 25 कोटींवर पोहोचते. सानिया मिर्झाचीही स्वतःची टेनिस अकादमी आहे. सानियाचे फक्त हैदराबादमध्येच घर नाही, तर तिचा दुबईत एक आलिशान बंगलाही आहे. अनेक आलिशान गाड्या आहेत. यामध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या कारचा समावेश आहे.
शोएब मलिकची संपत्ती किती?
शोएबची एकूण संपत्ती 228 कोटी रुपये आहे. म्हणजेच, शोएब मलिकची जवळपास सानिया मिर्झाच्या बरोबरीची आहे. शोएब टी-20 फ्रँचायझी लीगमध्ये खेळूनही चांगली कमाई करतो. तो बर्याच ब्रँड्सना एंडोर्स करतो. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पैसेही घेतो. त्याच्याकडे सुद्धा आलिशान वाहनांचा चांगला संग्रह आहे.