पुणे : आईने शेती आणि दूध विकून मुलीला वाढविले. आईने केलेल्या कष्टाचे फळ आता मुलीला मिळाले आहे. मुलगी आता इंग्लंडविरुद्ध विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणार आहे. तर आपण जाणून घेऊया भारतीय महिला संघातील अर्चना देवी या स्टार खेळाडूचा इथपर्यंतचा प्रवास..!
भारतीय महिला संघ १९ वर्षांखालील संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारत आणि इंग्लडं महिला संघांमध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आहे.
स्पर्धेदरम्यान भारतीय कर्णधार श्वेता सहरावत आणि पार्श्वी चोपडा यांच्याव्यतिरिक्त संघातीलइतर खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. अर्चना ही एक ऑफ स्पिनर गोलंदाज असून तिने विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे.
अर्चना देवी ही मुळची उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील आहे. उन्नावच्या एका छोट्या गावात तिचे घर आहे. अर्चना अवघ्या ४ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर पडली. वडिलांच्या निधनानंतर अर्चनाची आई शेती आणि गाईचे दूध विकून येणाऱ्या पैशांनी कसाबसा संसार चालवत होती.
मात्र, घरखर्चासाठी पुरेसा पैसा यातून मिळत नव्हता. अशात अर्चनाच्या शिक्षणासाठी देखील पैसे खर्च करणे तिच्या आईला परवडणारे नव्हते. अशात आईने कस्तूरबा गांधी निवासी शाळेत अर्चनाचा प्रवेश निश्चित केला. याठिकाणी तिच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत होत असल्यामुळे हा निर्णय आईने घेतला असल्याचे सांगितले जाते.
आईने आर्थिक अडचणीमुळे घेतलेला हा निर्णय पुढे अर्चनाच्या भविष्यासाठी सर्वात महत्वाचा ठरला. व शाळेत अर्चनाच्या सुप्तगुणांना वाव मिळाला.
कस्तुरबा गांधी शाळेत अर्चनामध्ये लपलेल्या सुप्तगुणांना वाव सर्वात आधी तिच्या शारिरिक शिक्षणाच्या शिक्षिका पूनम यांनी पारखले. शाळेत रनिंग करताना पूनम यांना अर्चनामध्ये इतर विद्यार्थिनींपेक्षा काहीतरी वेगळे जाणवले. याच कारणास्तव त्यांनी अर्चनाला क्रिकेट खेळण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली.
अर्चनाने वयाच्या १३ व्या वर्षी क्रिकेट शिकण्यासाठी उन्नाव सोडले आणि कानपूरला पोहोचली. याठिकाणी स्वतःच्या क्रिकेट खेळण्याच्या शैलीवर काम केले. कानपूरमध्ये असताना अर्चना अनेकदा फक्त पाण्यासोबत बिस्किट खाऊन मैदानात खेळण्यासाठी उपस्थित होत असायची.
दरम्यान, अर्चनाची आई सावित्रीने मुलगी भारतासाठी खेळत असल्यामुळे अश्यर्य वाटत असल्याचे सांगितले आहे. अर्चनाने या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकात आतापर्यंत एकूण ६ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने २० धावा खर्च करून १ विकेट घेतली आहेत.