मुंबई: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू आणि माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने खुलासा केला आहे की, ती संधिवाताशी झुंज देत आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तिला या खेळातील भविष्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. कारण सदर आजारामुळे तिला नेहमीप्रमाणे सराव करण्यात अडचणी येत आहेत.
माजी जागतिक नंबर वन खेळाडू 34 वर्षीय नेहवालने लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली नेहवाल ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. 2010 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेत्या सायनाने सांगितले की, ती यापुढे तिची कारकीर्द अंतिम टप्प्यात आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
अनुभवी नेमबाज गगन नारंग यांच्या ‘हाऊस ऑफ ग्लोरी’ पॉडकास्टमध्ये नेहवाल म्हणाली, ‘माझ्या गुडघ्याची परिस्थिती ठीक नाही. मला संधिवात आहे. माझे कार्टिलेज खराब झाले आहे. अशा स्थितीत आठ-नऊ तास खेळाशी जोडलेले राहणे फार कठीण आहे.
ती म्हणाला, ‘अशा परिस्थितीत तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंना आव्हान कसे देणार? अव्वल खेळाडूंविरुद्ध अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी दोन तासांचा सराव पुरेसा नसल्यामुळे मला काही प्रमाणात हे स्वीकारावे लागेल. नेहवाल म्हणाली की, ती अजूनही निवृत्तीचा तिच्यावर कसा परिणाम करेल, यावर विचार करत आहे. परंतु, शेवटी तिला निर्णय घ्यावा लागेल हे मान्य केले. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्याही आहेत. तिने खेळलेली शेवटची स्पर्धा एक वर्षापूर्वी सिंगापूर ओपनमध्ये होती, जिथे तिला सुरुवातीच्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
ती म्हणाली, ‘मी निवृत्तीचा विचार करत आहे. ते वेदनादायक असेल. साहजिकच खेळाडूची कारकीर्द नेहमीच लहान असते. मी वयाच्या नवव्या वर्षी सुरुवात केली. पुढच्या वर्षी मी 35 वर्षांची होईल. ‘माझी दीर्घ कारकीर्द आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी जे काही साध्य केले, त्यात मी आनंदी आहे. वर्षाच्या अखेरीस मला कसे वाटते, हे मी मूल्यांकन करेन. पद्मश्री पुरस्कार विजेत्या सायनाने सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे तिचे बालपणीचे स्वप्न होते आणि सलग दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होऊ न शकणे वेदनादायक होते.
नेहवाल म्हणाली, ‘ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे प्रत्येकाचे लहानपणापासूनचे स्वप्न असते. ती पातळी गाठण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तयारी करता. म्हणून, जेव्हा आपण हे साध्य करू शकणार नाही, हे लक्षात येते तेव्हा कधीकधी खूप वाईट वाटते. मी अत्यंत मेहनत घेतली आहे. मी तीन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्या सर्वांमध्ये मी माझे 100 टक्के दिले. मला त्याचा अभिमान वाटू शकतो आणि आनंदही असू शकतो.