RR vs RCB: मुंबई: आयपीएल 2024 चा 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे, तर बेंगळुरू संघाने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. दोन संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. या 30 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 15 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे. ३ सामने अनिर्णित राहिले. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये आरसीबीचे वर्चस्व दिसत आहे. पण राजस्थान रॉयल्सचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यानुसार बेंगळुरूला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संभाव्य ११: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, रीस टॉपली, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.
राजस्थान रॉयल्स संभाव्य ११: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्जर आणि युझवेंद्र चहल.