मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुखापत गंभीर नसली तरी महत्वपूर्ण लढतीच्या आधी अशी दुखापत होणे भारतीय संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही.
भरातीय संघाचा मंगळवारी सराव सुरु असताना फलंदाजीचा सराव करत असताना ही घटना घडली. थ्रो डाऊन दरम्यान रोहित शर्मा आर्म पूल फटाक्यांचा सराव करत असतानाचा फटका चुकला आणि चेंडू थेट त्याच्या हाताला लागला. चेंडू लागल्याक्षणी रोहित शर्माने नेट्स मधील सराव बंद करून बाहेर पडला. नेट्स मधून बाहेर येत रोहित शर्माने आइस पॅक लावताना दिसुन आला.
त्यानंतर रोहित नेटच्या जवळ बसला होता आणि लांबून दुसऱ्या खेळाडूंचा सराव पाहत होता. मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन बराच वेळ त्याच्या सोबत बोलताना दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितची दुखापत अधिक गंभीर नाही आणि १० नोव्हेंबर रोजी सेमीफानयलमध्ये खेळण्यास त्याला कोणतीही अडचण येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर भारतीय संघासाठी नक्कीच मोठी गंभीर बाब असणार आहे.
दरम्यान १० तारखेला भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. या लढतीसाठी रोहित शर्मा फिट असणे संघाचे मनोधैर्य उंचावणारे ठरणार आहे.