पुणे : बीसीसीआयने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला टी-२० मालिकेसाठी तर शिखर धवनला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी यांसारखे मोठे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाचा भाग नाहीत. हे सर्व खेळाडू टी-20 विश्वचषकानंतर मायदेशी परततील. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारताला बांगलादेशचा दौरा करायचा आहे.
विश्वचषकानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठीचा संघ बीसीसीआयने सोमवारी (३१ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 संघाची कमान हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे असेल.
टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया:
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक
टी- T20I मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20I – १८ नोव्हेंबर (वेलिंग्टन)
दुसरा T20I – २० नोव्हेंबर (माउंट माउंगानुई)
तिसरा T20I – २२ नोव्हेंबर (नेपियर)
वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे – २५ नोव्हेंबर (ऑकलंड)
दुसरा वनडे – २७ नोव्हेंबर (हॅमिल्टन)
तिसरा वनडे – ३० नोव्हेंबर (ख्राइस्टचर्च)