मुंबई : श्रीलंका संघाविरोधात टी -२० मालिकेत विजय साकारल्यानंतर भारतीय संघात आनंदाचे वातावरण आहे. यातच उद्यापासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा व रनमशीन विराट कोहली हे देखील पुनरागमन करणार असल्याने भारतीय संघ अजुनच मजबूत होणार आहे.
टी -२० मालिका भारताने २-० अशी खिशात घेतली होती. आता उद्यापासून (दि. १०) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. टी -२० मध्ये हार्दिक पंड्या याने नेतृत्व केले होते. एकदिवसीय लढतीत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यात असताना दुखापतीमुळे माघारी आला होता. आता मात्र तो तंदुरुस्त असून भारतीय संघातून खेळण्यास उत्सुक आहे.
या एकदिवसीय मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करणार आहेत. यात विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हे सर्व खेळाडू पहिल्या एकदिवसीय लढतीसाठी गुवाहाटीला पोचले आहेत. यापूर्वी भारत आणि श्रीलंका हे दोन संघ १६२ वेळा आंतरराष्ट्रीय लढती खेळले आहेत.
यात भारताने ९३ तर श्रीलंकेने ५७ लढतीत विजय साकारला असून ११ लढती अनिर्णित आहेत. एक लढत बरोबरीत सुटली आहे. उद्यापासून सुरु होणारी मालिका भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १. ३० वाजता सुरु होणार आहे.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह.
श्रीलंका :
दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडू फर्नांडो, अविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसांका, धनंजय डिसिल्व्हा, चरित अस्लंका, चमिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा (यष्टीरक्षक), प्रमोदकान, प्रमोदकान, प्रमोदशमन ड्युनिथ वेलागे, जेफ्री वांडरसे, कसून रजिथा, लाहिरू कुमारा आणि महिश तिक्ष्णा.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :
१० जानेवारी – पहिला वनडे, गुवाहाटी, दुपारी १.३० वा
१२ जानेवारी – दुसरी वनडे, कोलकाता, दुपारी १.३० वा
१५ जानेवारी – तिसरा एकदिवसीय, तिरुवनंतपुरम, दुपारी १.३० वा