मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठीही संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांना एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. दोन्ही मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. या दौऱ्यात सीनियर खेळाडूंसह काही ज्युनियर खेळाडूंची जुळवाजुळव पाहायला मिळणार आहे. मात्र एका स्टार खेळाडूला संघातून वगळण्यात आले आहे.
‘या’ मोठ्या खेळाडूची वनडे कारकीर्द संपली का?
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. त्याचवेळी विराट कोहली 7 वर्षांनंतर श्रीलंकेत वनडे मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. याचाच अर्थ या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या संघातून अष्टपैलू रवींद्र जडेजा गायब आहे. म्हणजेच वनडे मालिकेसाठी त्याला टीम इंडियाच्या संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचे मानले जात आहे.
नुकतीच T20I फॉरमॅटमधून निवृत्ती
रवींद्र जडेजा रवींद्र जडेजा 2024 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता. पण या स्पर्धेनंतर त्याने T20I फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. अशा परिस्थितीत तो आता फक्त वनडे आणि कसोटीत खेळताना दिसणार आहे. मात्र, या दौऱ्यात जडेजाला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. गेल्या काही काळापासून जडेजाच्या कामगिरीत बरीच घसरण होत आहे, त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची अष्टपैलू म्हणून या दौऱ्यासाठी वनडे संघात निवड करण्यात आली आहे.
T20I कारकीर्द 15 वर्षे चालली
जडेजाने 10 फेब्रुवारी 2009 रोजी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये खेळला. या काळात त्याने भारतासाठी 74 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 515 धावा केल्या आणि 54 धावा आपल्या नावावर केल्या. याशिवाय त्याने टीम इंडियासाठी 72 कसोटी आणि 197 वनडे सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटीत 3036 धावा आणि 294 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, त्याच्या नावावर वनडेमध्ये 2756 आणि 220 विकेट्स आहेत.