पर्थ : भारत- दक्षिण आफ्रिका यांचा टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना पर्थ येथे आज रविवारी (ता.३०) होणार आहे. मात्र सध्या तिथे पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने लढत होणार कि नाही याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र या सामन्यात जो संघ विजय मिळविणार आहे. तो थेट उपांत्य फेरी गाठणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना आज दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. भारत सुपर-१२ चे पहिले दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पर्थची खेळपट्टी पाहिली तर वेगवान आणि उसळी घेणारी आहे, हेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवे आहे.
दरम्यान, आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियामध्ये होत असून या संपूर्ण विश्वचषकात पाऊस मात्र व्हिलन म्हणून आडवा येताना दिसतो आहे. पाऊस हा विश्वचषकात गेम चेंजर ठरत आहे. आतापर्यंत चार सामने हे या विश्वचषकात पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस गोंधळ घालणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, कागिसो रबाडा, रिली रोसोव, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन जॅन्सेन, मार्को जॅनसेन.