मुंबई: 2024 मधील T20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडने गमतीने सांगितले होते की, तो सध्या बेरोजगार असून नवीन नोकरीच्या शोधात आहे. आता एक बातमी आली आहे की, द्रविडला नवीन नोकरी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर राहुल द्रविड लवकरच आयपीएलमध्ये दिसणार आहे. राहुल द्रविड लवकरच गौतम गंभीरची जागा घेणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्याशी संपर्क साधला आहे.
द्रविड केकेआरचा मेंटर होणार का?
केकेआरने राहुल द्रविडशी संपर्क साधला असून त्याला टीम मेंटॉर पद द्यायचे आहे. आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीर केकेआरचा मेंटॉर होता आणि टीम चॅम्पियनही बनली होती. परंतु, आता असे मानले जात आहे की, गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे आणि अशा परिस्थितीत त्याने केकेआरची साथ सोडली आहे. त्यानंतर केकेआरने राहुल द्रविडला आपला मेंटॉर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
द्रविडचा अनुभव आयपीएलमध्ये उपयोगी पडेल
मात्र, राहुल द्रविडकडेही आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. राहुल द्रविडने आयपीएलमध्ये ८९ सामने खेळले असून तो राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षकही होता. द्रविडने अलीकडेच टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. आता केकेआरला आशा आहे की, हा अनुभवी खेळाडू त्यांच्या संघात सामील होईल. द्रविड केकेआरमध्ये सामील झाल्यास त्याला मोठी रक्कम मिळू शकते. द्रविडला बीसीसीआयने वर्षाला १२ कोटी रुपये दिले होते, ही रक्कम त्याला केकेआरकडूनही मिळण्याची शक्यता आहे.