नवी दिल्ली : सद्या कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना चालू आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रविचंद्रन अश्विनने बांगलादेशचे तीन गडी बाद करत नवा इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये 50 पेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन हा जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमधील चौथा दिवस हा अत्यंत रोमांचकारी ठरला आहे. यामध्ये तीन बळी आर अश्विनने घेतले आहेत. यासोबतच त्याने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये 50 पेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन हा जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे.
बाग्लादेशच्या पहिल्या इनिंगमध्येच हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. शकिब अल हसनला आऊट करताच त्याने विक्रमाला गवसणी घातली. दरम्यान दुसऱ्या इनिंगमध्ये देखील त्याने बांग्लादेशचे दोन गडी बाद केले आहेत. 38 वर्षीय आर आश्विनच्या नावावर आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 52 विकेट झाल्या असून जोश हेजलवुडच्या नावावर 51 विकेट आहेत तर पॅट कमिन्सच्या नावावर एकूण 48 विकेट आहेत.