पुणे : एमीरेट्स क्रिकेट बोर्डचे सध्याचे हेड फिजिओ डॉ. मनीष परदेशी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष T20 वर्ल्डकपसाठी ”हेड फिजिओथेरपीस्ट” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आला आहे.
भारतात विविध पातळीवर काम करत असताना, डॉ. मनीष परदेशी यांनी आत्ता पर्यंत त्यांनी इंडियन फुटबॉल , इंडियन कब्बडी , इंडियन बॅडमिंटन , ऑल इंडिया युनिव्हर्सिटी आणि प्रो कब्बड्डी लीग च्या विविध टीम्स साठी, प्रो कब्बडी, आणि अनेक विविध पातळीवर राहून भारतीय आणि विदेशी खेळाडूंना उत्तम फिजिओ ट्रीटमेंट्स देऊन खेळासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या सक्षम केले आहे.
दरम्यान, डॉ. मनीष परदेशी यांनी यूएई संघांसाठी उत्तम कामगिरी करत संघाच्या खेळाडूंचा फिटनेस खूप उत्तमरित्या सांभाळला आहे. आणि आता त्यांच्याकडे T20 वर्ल्ड कप 2022 मधील सर्वच संघांच्या फिजिओ थेरपीची संपूर्ण जबाबदार सुपूर्त करण्यात आली आहे. ही एक नवीन विशेष जवाबदारी मिळणे म्हणजे त्यांच्या उत्तम कार्याची आणि सेवेची एक प्रकारे ही पावतीच आहे. त्यामुळे भारतासाठी नक्कीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे.