Syed Mushtaq Ali T20 Trophy : मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये अनसोल्ड राहिला. त्या नंतर तो जास्तच चर्चेत आला आहे. पृथ्वीने त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये इतकी ठेवली होती. मात्र त्यानंतरही पृथ्वीला कुणी घेण्यात रस दाखवला नाही. पृथ्वी गेल्या काही महिन्यात क्रिकेटपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याचाच फटका त्याच्या कामगिरीवर झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पृथ्वीला आता धावांसाठी झगडावं लागत आहे. सध्या देशातील विविध ठिकाणी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत असून या स्पर्धेत पृथ्वी 2 वेळा त्याला भोपळाही फोडता आलेला नाही.
हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 3 डिसेंबरला मुंबई विरुद्ध सर्व्हिसेस यांच्यातील सामन्यात पृथ्वी पहिल्या डावात भोपळा न फोडता माघारी परतला. पृथ्वीची ही या स्पर्धेतील 5 सामन्यांमधील झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली आहे. याआधीही पृथ्वी याआधी 27 नोव्हेंबरला महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याला भोपळा फोडता आला नाही.
पृथ्वीच्या या 2 भोपळ्यांचा अपवाद वगळता युवा फलंदाजाला इतर 3 सामन्यांमध्ये अपेक्षित आणि आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्याला त्या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. पृथ्वीने गोव्याविरुद्ध 33, केरळविरुद्ध 23 तर नागालँडविरुद्ध 40 धावा केल्या. मात्र त्याला अर्धशतकापर्यंत पोहचण्यात अपयश आलं.
पृथ्वीची मागील 5 सामन्यांमधील धावा..
विरुद्ध गोवा : 33 धावा
विरुद्ध महाराष्ट्र : 0
विरुद्ध केरळ : 23 धावा
विरुद्ध नागालँड : 40 धावा
विरुद्ध सर्व्हिसेस : 0
5 सामने 2 भोपळे