नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाई होप आणि अभिषेक पोरेल यांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या. सॅन कुरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर पंजाब संघाने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले आणि 4 गडी राखून विजय मिळवला.
दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी दिल्लीला 174 धावांत रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाने 100 धावांत 4 विकेट गमावल्या. यानंतर सॅम कुरनने 63 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. खलील अहमदने लागोपाठ दोन चेंडूंवर प्रथम सॅम कुरन आणि नंतर शशांक सिंगला बाद करून सामन्यात रंगत आणली.
दिल्लीने 174 धावा केल्या
नाणेफेक हरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. पहिल्या दहा षटकांत संघाने दोन गडी गमावून 74 धावा केल्या. यानंतर सातत्याने विकेट पडत गेल्या आणि धावसंख्या 147 धावांत 8 विकेट्स अशी झाली. डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत आणि मिचेल मार्श मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. अखेरीस, अभिषेक पोरेलने 10 चेंडूत 32 धावांची खेळी केली आणि धावसंख्या 174 धावांपर्यंत नेली.
सॅम कुरनचे अर्धशतक
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमाची सुरुवात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनने शानदार अर्धशतकाने केली आहे. संघ अडचणीत असताना या खेळाडूने आपली ताकद दाखवत दिल्लीविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळली. पंजाब संघाने 100 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर एका टोकाला राहून सॅमने 39 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. सॅमने 47 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.