दुबई: आयपीएल लिलावात इतिहास रचला गेला. याआधी झालेल्या सर्व लिलावांचे रेकॉर्ड मोडले गेले. आयपीएलची सर्वात मोठी बोली ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर लागली आहे. सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले आहे. कमिन्सने सॅम कुरनचा विक्रम मोडला आहे, जो यापूर्वी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
सनरायडर्स हैदराबादसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कमिन्ससाठी बोली लावली. पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली, ज्याने आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू विकत घेण्याचा विक्रम केला. अलीकडेच भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर पहिली बोली चेन्नई संघाने लावली होती, मात्र 7.60 कोटींची बोली लागल्यानंतर चेन्नई संघ बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल आणि रचिनला आपला भाग बनवले
शार्दुल ठाकूर आणि रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्जने आपली आपल्या ताफ्यात घेतले आहे. शार्दुल २०२३ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता, पण केकेआरने त्याला सोडले. आता लिलावात चेन्नईने त्याला 4 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे. शार्दुलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चेन्नईने त्याला मूळ किंमतीपेक्षा 2 पट जास्त म्हणजेच 4 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले.
याशिवाय 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रलाही चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात सामील करून घेतले. रचिनला चेन्नई संघाने 1.80 कोटी रुपयांना खरेदी केले, तर त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. वर्ल्ड कपमध्ये रचिनने एकूण तीन शतके झळकावली होती.