पुणे: अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI )च्या वतीने येत्या ९, ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान दुसऱ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती युएसएफआयचे जनरल सेक्रेटरी व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन पाणिग्रही यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेला अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI), रिअर अॅडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष आरएलएसएस (आय), कौस्तव बक्षी (महाव्यवस्थापक RLSS(I), जॉर्ज मकासरे (उपाध्यक्ष RLSS(I) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना डॉ. तपन पाणिग्रही म्हणाले, फिनस्विमिंग हा स्पर्धात्मक जलतरण स्पर्धेचा नवीन प्रकार असून लोकप्रिय प्रकार आहे. भारतात ते USFI च्या पुढाकाराने हा जलतरण प्रकार लोकप्रिय होत आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून ३४ राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील ३०० पेक्षा जास्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक हजार पेक्षा स्पर्धक व ७० तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत स्त्री व पुरुष या दोन्ही गटात विविध वयोगटांमध्ये एकूण ५१६ पदकांसाठी १७२ विभागात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेते खेळाडू १३ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान विंडसर, ओंटारियो, कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) चे लाइफसेव्हिंग स्पोर्ट्स २०२२ हे अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जीव वाचवणारे खेळ हे एकमेवाद्वितीय असतात कारण ते एकमेव असे खेळ आहेत ज्यात प्रथम जीवन वाचवण्यासाठी कौशल्ये शिकली जातात आणि त्यानंतरच समुद्र, समुद्रकिनारे किंवा स्विमिंग पूलमधील स्पर्धांसाठी विविध कौशल्ये आणि तंत्रे वापरली जातात. हे जीवनरक्षक खेळ नागरिकांसाठी ‘प्रशिक्षण शिबिर’ म्हणून काम करतील, असे मत डॉ. तपन पाणिग्रही यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) ही रॉयल लाइफसेव्हिंग सोसायटी कॉमनवेल्थची अधिकृत शाखा आहे आणि इंटरनॅशनल लाइफसेव्हिंग फेडरेशनची सदस्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व निवडींना RLSS (इंडिया) द्वारे मान्यता दिली जाईल.