पॅरिस: सिंधूने ग्रुप स्टेजमधील सलग दुसरा सामना जिंकून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा 21-5, 21-10 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना 33 मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम 14 मिनिटांत तर दुसरा गेम 19 मिनिटांत जिंकला. आता सिंधूसाठी पुढील वाटचाल अवघड असेल. बाद फेरीतील एकही पराभव बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तत्पूर्वी, एम गटातील शेवटच्या सामन्यात तिने मालदीवच्या फातिमा अब्दुल रज्जाकचा २१-९, २१-६ असा पराभव केला होता. सर्व 16 गटांतील अव्वल खेळाडू उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतात.
पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सिंधूला जास्त घाम गाळावा लागला नाही. जागतिक क्रमवारीत ७३व्या क्रमांकावर असलेल्या इस्टोनियन खेळाडूला १३व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूचा सामना करता आला नाही. सिंधूने पहिला गेम 14 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कुबाने आव्हान सादर केले पण सिंधूने प्रत्येक आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले.