पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, नीरज चोप्राने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करत भालाफेकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नीरज चोप्राने पात्रता फेरीत सर्वोच्च स्कोर नोंदवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर फेक करून भालाफेक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पात्रता फेरीतील कोणत्याही भारतीय भालाफेकपटूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
8 ऑगस्ट रोजी अंतिम सामना होणार
नीरज चोप्राने या मोसमात 89.34 मीटर फेक करून आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या थ्रोमुळे तो त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम थ्रोच्या अगदी जवळ आला. नीरजची सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता तो अंतिम फेरीत 90 मीटरचा अडथळा पार करेल असे वाटते.