Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आजचा नववा दिवस आहे. भारतीयांच्या आशा आज पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळामध्ये उंचावल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पदकाच्या आणखी एक पाऊल जवळ गेला आहे. भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आज पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर मात केली आणि उपांत्य फेरी गाठली आहे.
#ParisOlympics2024 | India beat Great Britain in Men’s Hockey quarterfinal; enters semi-final pic.twitter.com/b07wyCEbdi
— ANI (@ANI) August 4, 2024
सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी गोलकीपर पी.आर. श्रीजेशने आपल्या उत्तम बचावाचं प्रदर्शन घडवलं. ग्रेट ब्रिटनच्या संघाने निर्धारित वेळेत केलेली 21 आक्रमणं श्रीजेशने परतावून लावली. याव्यतिरिक्त पेनल्टी शूटआऊटमध्येही श्रीजेशने ग्रेट ब्रिटनचा तिसरा आणि चौथा प्रयत्न हाणून पाडला. याचदरम्यान भारताच्या आघाडीच्या फळीने मिळालेल्या संधीचं सोनं करत शूटआऊटमध्ये चार संधीत चार गोल करत भारताच्या 4-2 या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताचा गोलकीपर श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये 4 गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, भारतानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.