पुणे : वॉशिंग्टन सुंदरसमोरे किवीं संघ ढेर झाला आहे. पहिल्या डावात न्यूझीलंड संघ 259 धावांवर सर्वबाद झाला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दबदबा दिसत असताना सुंदरने आपल्या फिरकीची जादू दाखवली अन् किंवीला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकून न्यूझीलंडला चांगली सुरूवात मिळाली. रचिन रविंद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी अर्धशतकीय खेळी केली. मात्र, लंचनंतर रोहितने आपली जादूची कांडी फिरवली आणि वॉशिंग्टन सुंदरला बोलवलं. त्यानंतर सुंदरने किवींचा खात्मा केला आहे.
पुण्यामध्ये भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना सूर आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला आहे. पहिल्या कसोटीसाठी संघात निवड न झालेल्या वॉशिंग्टन सुंदरला अचानक दुसऱ्या संघात बोलावण्यात आलं अन् त्यानंतर प्लेइंग-11 मध्येही त्याचा समावेश करण्यात आला. कुलदीप यादवच्या जागी त्याचा समावेश करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं पण सुंदरने सात विकेट घेत संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय सार्थ ठरवला आहे. योग्य असल्याचे सिद्ध केलं. त्याने 23.1 ओव्हरमध्ये 59 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच अश्विनने सुद्धा 3 विकेट घेत सुंदरला चांगली साथ दिली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.