पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सिरीजचा अंतिम आणि शेवटचा सामना इंदूरमध्ये मंगळवारी (ता.२४) होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना दुखापतीग्रस्त झाला.
दुसऱ्या सामन्यात ग्लेन फ्लिप्सने कव्हर डाईव्हवर शॉट मारला. हा शॉट रोखण्यासाठी विराटने उंच उडी घेतली, जेणेकरून तो बॉल थांबवू शकेल. यामध्ये बॉल थांबला नाही, मात्र विराट कोहली एंजर्ड झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फिल्डींगदरम्यान दुखापत झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. यावेळी फिजीओने त्याच्या हातावर पट्टी देखील बांधली. मात्र दुखापत असूनही तो पुन्हा मैदानावर उतरला होता. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विराट कोहलीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, जर तिसऱ्या सामन्यात कोहलीला संधी दिली गेली नाही तर प्लेईंग ११ मध्ये रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्यातरी कोहलीच्या या दुखापतीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.