पुणे : येथील गहुंजे मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची महत्त्वाच्या बैठकीत जामखेड कर्जतचे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्याकडे संघटनेचे अध्यक्षपद सोपविण्यात आले.
व्यवसाय व राजकारण या दोन्ही गोष्टीत आमदार रोहित पवार यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. शनिवारी एमसीएची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत आमदार रोहित पवार यांना एमसीएच्या सोळा सदस्यीय समितीमध्ये सहभागी करण्यात आले. समिती सदस्यांनी एकमताने आमदार रोहित पवार यांच्याकडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद सोपविले. क्रिकेट संघटनेची जबाबदारी स्वीकारणारे रोहित पवार हे दुसरे सदस्य आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व खासदार शरद पवार यांनी एमसीएचे अध्यक्षपद भूषविले होते. यापूर्वी शरद पवार यांनी सन २००१-०२ व २०१३ साली महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर जवळपास १० वर्षानी पवार कुटुंबातील सदस्य हा एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
चौकट : किरण सावंत उपाध्यक्षपदी…
राजकारण आणि क्रीडा यात दोन्ही कडील लोकांना रस असतो. सध्या शिंदे गटातील मत्तबार नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांचे बंधू किरण सावंत हे राज्य क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. महविकास आघाडीत असताना आमदार रोहित पवार, उदय सावंत एकाच बाजूला होते. मात्र, उदय सावंत यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. आता मात्र, उदय सावंत यांचे बंधू किरण सावंत हे थेट एमसीएचे उपाध्यक्ष झाल्याने क्रिकेटच्या मैदानात राजकारणाचा सामना रंगला, तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे.