India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना खेळवला जात असून या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांवर संपुष्टात आला आहे. थरथर कापणाऱ्या बॉलसमोर टीम इंडियाने टिकून सामना केला खरा पण एकाही खेळाडूला मैदनाव र जास्त वेळ तग धरता आलेला नाही. टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांची सुंदर खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने सहा विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू आऊट होऊन माघारी गेला. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही भागीदारी मोडीत काढत त्याने राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलला 37 धावाच करता आल्या. विराट कोहली सात धावात तंबूत परतला. त्यानंतर शुभमन गिल 31 धावा करून तर कर्णधार रोहित शर्मा तीन धावा करून बाद झाला. यावेळी 18 धावा करताना भारताने आणखी चार विकेट गमावल्या होत्या.
अश्विन-नितीश रेड्डीने डाव सावरला..
अश्विनने नितीश रेड्डीसोबत डाव सांभाळण्याचा थोडा प्रयत्न केला आणि सातव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी त्यांनी रचली. स्टार्कने पुन्हा एकदा भारताला अडचणीत आणलं अन् त्याने आश्विनला माघारी पाठवलं. हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. त्यानंतर नितीश रेड्डीने एकाकी झुंज देत टीम इंडियाला 180 धावांपर्यंत पोहोचवलं.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.