मुंबई: T20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी (9 जून) भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहा धावांनी दणदणीत विजय नोंदवला. पण हा सामना भारतासाठी एक दु:खद बातमी घेऊन आला. हा शानदार सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे सामन्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भारत – पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमेरिकेत आलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहत होते. सामन्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. संदीप पाटील यांचा पराभव करून अमोल काळे अध्यक्ष झाले होते
अमोल काळे हे गेल्या वर्षीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला होता. शेलार आणि फडणवीस यांच्याशिवाय अमोल यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही पाठिंबा मिळाला होता.