पुणे : शिवराज्य समूह यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महारुद्र जिमच्या सचिन हगवणे याने ‘साहेब श्री’ हा किताब पटकावताना स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर लावली. ईगल हाऊसच्या अरबाज शेखने बेस्ट पोझर, प्लस फिटनेसच्या बिपीन साष्टेने ‘अपकमिंग बॉडीबिल्डर’, तर हौशींगी फिटनेसचा अविनाश रासगेने ‘मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ हा किताब मिळविला.
महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग संघटनेच्या मान्यतेने, पुणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन व शिवराज्य समूहाचे अध्यक्ष तथा शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन समृद्धी लाँन येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन टायगर ग्रुपचे तानाजी जाधव व अनिकेत घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘ भारत श्री ‘ महेश हगवणे, जिल्हापरिषद माजी सभापती शुक्राचार्य वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नागरसेवक बाळाभाऊ धनकवडे, पुणे शहरचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, बारामती लोकसभा ओबीसी सेलचे संतोष चाकणकर, खडकवासला युवक राष्ट्रवादीचे शरद दबडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश चाकणकर, मंगेश साळुंखे, सोमनाथ शेडगे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शिवराज्य समूहाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय खेळांनी शरीर मजबूत बनते. यातून मनाचा निर्धार देखील पक्का होतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही मजबूत असल्यास तुम्ही कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असता. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी बोलताना सांगितले.
आयोजक भूपेंद्र मोरे म्हणाले की, शिवराज्य समूहाच्या वतीने सातत्याने भारतीय खेळाचे आयोजन करण्यात येते. यातून आपल्या भागातील तरुणाईला हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धामागील मुख्य हेतू आहे. यामुळे आपल्या भागातील खेळाडू देखील आपले नाव भारतभर गाजवतील, असा विश्वास भूपेंद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केला .
स्पर्धेत ५५ किलो वजनी गटातून टान्सफॉर्मर्स फिटनेसच्या अजय ओझरकरने, ६० किलो वजनी गटातून प्लस फिटनेसच्या बिपीन साष्टेने तर ६५ किलो वजनी गटातून हनुमान जिमच्या सचिन सावंतने विजतेपदाला गवसणी घेतली.
७० किलो गटातून ईगल हाऊसचा अरबाज शेख अव्वल ठरला. ७५ किलो वजनी गटातून हौशींगी फिटनेसचा अविनाश रासगेने तर ८० किलो गटातून महारुद्र जिमचा सचिन हगवणेने विजेतेपद पटकावले. ८० किलो वरील गटात फ्लेक्स जिमच्या फिरोझ शेखने विजेतेपद मिळवले.