लखनऊ: कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरन संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. त्याने सांगितले की, केएल राहुल एक प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसतो. या सामन्यात जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा हे पंजाबसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. तर, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे लखनऊ परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसतील.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब: प्रभसिमरन सिंग, रिले रुसो, तनय थागराजन, विदावथ कावेरप्पा, हरप्रीत भाटिया.
लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बदुनी, निकोलस पूरन (क), मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
इम्पॅक्ट सब: ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौतम.