पुणे : लॉयला करडंक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी यजमान लॉयला प्रशाला संघाने १२, १४ आणि १६ वर्षांखालील अशा तीनही गटात दणदणीत विजयाची नोंद केली. ही स्पर्धा टाटा ऑटोकॉम्पने पुरस्कृत केली आहे.
लॉयल प्रशालेच्याच मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत लॉयला प्रशालेच्या तीन संघांनी मिळून २९ गोलची नोंद केली.
१२ वर्षांखालील गटात अनुराग पारसनीसने तीन, तर आदिराजने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर लॉयला प्रशालेने श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा ७-० असा पराभव केला. त्यानतर पार्थ शिंदेचे चार, परम कुलकर्णीचे तीन, शुभम चौधरी, अरहन खानचे प्रत्येकी दोन आणि आयुष चव्हाण, दर्श कासटने नोंदवलेल्या एकेक गोलच्या जोरावर लॉयला प्रशाला संघाने डॉ. श्यामराव कलमाडी प्रशालेचाच १३-० असा पराभव केला.
मुलांच्या १६ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने कलमाडी प्रशालेचाच ९-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात ब्रायन डिसूझाने ५ गोल केले. त्याला धीर परमारने दोन आणि सम्यक सासर, श्लोक निम्हण यांनी एकेक गोल करून सुरेख साथ केली.
निकाल –
१२ वर्षाखालील: लॉयला प्रशाला : ७ (अनुराग पारसनीस १४, १७, १९वे मिनिट; आदिराज सिंग ८, २०, ३०, ३४वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला :०
एसएसपीएमएस (बोर्डिंग): १ (स्वराज माने ३४वे मिनिट)वि.वि. सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल: ०
14 वर्षाखालील: लॉयला प्रशाला : १३ (शुभम चौधरी ११, ३०वे मिनिट, परम कुलकर्णी १६, २६, ३१वे मिनिट, अरहान शेख २८, ३२वे मिनिट; आयुष चव्हाण ३०वे मिनिट, पार्थ शिंदे ३८, ४२, ४५, ४८वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला : ०
सेंट अरनॉल्ड सेंट्रल प्रशाला : ७ (विराज बाजारे ३रे; अर्शन सिद्धीबिलाल १९, २२, २६वे मिनिट, आरुष पाटील ३६वे मिनिट; अथर्व शुक्ला ४१वे मिनिट; संजीत डायस ४८वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग): १ (लोकेश सोनवणे ३८वे मिनिट)
१६ वर्षाखालील: लॉयला प्रशाला : ९ (ब्रायन डिसोझा १०, २०, २३, ३३, ५८वे मिनिट, धीर परमार २५, ४६वे मिनिट, सम्यक सासर ४८वे मिनिट; श्लोक निम्हण ५९वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला : ०
सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल : ७ (अश्मित कुननाथ १२वे; जोहान विनोद १४, ४४, ४८वे मिनिट तनिष्क सोळसे २९वे; आयुष सोनवणे ३२, ३६वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) २ : (कुशाल आहेर २३वे, अथर्व 1ले मिनिट).