Joe Root : इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रुट सद्या खूप फार्मात आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाका केला आहे. रुटने बासिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे शानदार झंझावाती शतक खेळी केली आहे. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 36 वं तर 52 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. रुटने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रुटने अफलातून शतक ठोकण्यासाठी मोठी जोखमी घेत चौकार ठोकला आणि आपलं शतक पूर्ण केलं.
2021 पासून 19 वं कसोटी शतक
जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धमाकेदार शतकी खेळी करत आहे. रुटचं 2021 पासूनचं हे 19 वं शतक ठरलं आहे. तर इतर फलंदाजांना रुटच्या तुलनेत 10 शतकंही करता आलेली नाहीत. न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने 2021 पासून 9 तर इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने 8 शतकं ठोकली आहेत.
राहुल द्रविडचा महारेकॉर्ड तोडला..
जो रुटने सर्वात कमी डावांमध्ये 36 वं कसोटी शतक पूर्ण केलं आहे. रुटने यासह दिग्गज भारतीय माजी कर्णधार राहुल द्रविड याचा विक्रम मोडीत काढला आहे. रुटने 275 व्या डावात हे शतक पूर्ण केल. तर द्रविडने 276 व्या डावात 36 वं कसोटी शतक झळकावलं होतं.तसेच सर्वात कमी डावात वेगवान 36 शतकं करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. पॉन्टिंगने 200 व्या डावातच ही कामगिरी करून दाखवली होती. तर सचिनने 218 डावात ही कामगिरी केली.
सर्वात कमी डावांत 36 शतकं
- रिकी पॉन्टिंग : 200 डाव
- कुमार संगकारा : 210 डाव
- सचिन तेंडुलकर : 218 डाव
- जॅक कॅलिस : 239 डाव
- जो रुट : 275 डाव
- राहुल द्रविड : 276 डाव
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टिम साउथी आणि विल्यम ओरोर्के.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर.