ढाका : उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या कसोटीत तब्बल १२ वर्षांपासून वाट पाहात असलेल्या जयदेव उनाडकटचा सहभाग निश्चित झाला आहे. भारतीय संघाची कसोटी संघाची जर्सी मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. त्याच्या पत्नीने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.
बांगलादेशात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाला होता. त्याच्या जागी उनाडकटची निवड करण्यात आली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत जयदेव उनाडकट हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सन २०१० साली म्हणजेच तब्बल १२ वर्षांपूर्वी उनाडकटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामान खेळाला होता.
त्या लढतीत त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्यानंतर तो भारतीय संघासाठी अंतरराष्ट्रीय सामना देखील ४ वर्षांपूर्वी खेळा असून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य संधी मिळाली नव्हती.
मात्र, जयदेव उनाडकट याने देशांतर्ग सुरु असलेल्या सामन्यांमध्ये आपली चमक कायम राखली. त्याने आतापर्यंत ९६ प्रथमश्रेणी लढती खेळताना ३५३ गडी बाद केले आहेत. सन २०१९ साली झालेल्या रणजी करंडका मध्ये तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने सौराष्ट्र संघाने नेतृत्व केले होते.