मुंबई: जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत खेळला नव्हता. वास्तविक या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, जसप्रीत बुमराहच्या आयसीसी क्रमवारीत कोणताही फरक पडलेला नाही. जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह ८६७ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत या वेगवान गोलंदाजाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह इंग्लिश फलंदाजांसाठी अडचणीचा गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराह इंग्लिश फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला…
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. तो रांची कसोटीचा भाग नव्हता. त्याचबरोबर या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा टॉम हार्टली पहिल्या क्रमांकावर आहे. टॉम हार्टलीच्या नावावर 20 विकेट्स आहेत, मात्र या फिरकीपटूने जसप्रीत बुमराहपेक्षा 1 कसोटी जास्त खेळली आहे. जसप्रीत बुमराहने 4 कसोटी सामन्यात 13.65 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहच्या आसपास कोणी नाही!
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांमध्ये टॉम हार्टली आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय रवींद्र जडेजा, रवी अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, या सर्व गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहची सरासरी सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर या मालिकेत भारतीय संघ 3-1 ने आघाडीवर आहे. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. मात्र, या मालिकेतील पाचवी कसोटी ७ मार्चपासून खेळवली जाणार आहे. धर्मशाला येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.