पॅरिस: जगभरातील क्रीडाप्रेमींना हादरवून सोडणारी घटना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडली आहे. महिला बॉक्सरची पुरुष बॉक्सरशी स्पर्धा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण महिलांच्या वेल्टरवेट श्रेणीचे आहे, ज्याच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियन बॉक्सर इमान खेलीफ यांच्यात सामना झाला होता. मात्र, ही लढत अवघ्या 46 सेकंदात संपली. काही ठोसे बसल्यानंतर इटालियन बॉक्सरने सामना सोडला आणि अल्जेरियन बॉक्सर इमान खेलीफला विजेता घोषित करण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी लिंग चाचणीत फेल झाल्यामुळे इमान खेलीफला अपात्र घोषित करण्यात आले होते.
इमान खेलीफवर पुरुष असल्याचा आरोप आहे
इमान खेलीफचा पॅरिस ऑलिम्पिकमधील सहभाग बराच वादग्रस्त आहे. या वादाचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने घेतलेली तिची चाचणी. इमान खेलीफची तपासणी केली असता तिच्या टेस्टोस्टेरोनचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आले आणि यासोबतच तिच्या डीएनए चाचणीत एक्सवाय क्रोमोजोम्स आढळून आले. XY गुणसूत्र म्हणजे मुलगा. मुलीचे गुणसूत्र XX असते. या कारणावरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने इमान खेलीफ बंदी घातली होती. यानंतर अल्जेरियन बॉक्सरने या निर्णयाविरोधात अपील केले. पण नंतर तिने ते मागे घेतले. एकंदरीत डीएनए चाचणीने इमान खेलीफ ही मुलगीच नसल्याचे सिद्ध झाले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संधी कशी मिळाली ?
आता प्रश्न असा आहे की, एवढा मोठा आरोप होऊनही इमान खेलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी कशी मिळाली? वास्तविक, आयबीए ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग सामने आयोजित करत नाही. या स्पर्धांची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या हातात आहे, ज्याने 1999 मध्ये सर्व चाचण्या थांबवल्या होत्या. ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी महिला बॉक्सर्सना आता केवळ महिला असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
Transgender woman beats the face off biological woman in under a minute.
Women are going to die if we don’t end this madness right nowThe XY chromosome gives men a 200% innate ability to punch harder than the XX chromosome
This is pure evil & must stop before someone’s… pic.twitter.com/qlufkdpdoT
— ♱ Vicar Øf Christ ♱Fire-Breathing♱Dragon-Master♱ (@Vicar0fChrist) August 1, 2024
;
पराभूत बॉक्सर काय म्हणाली?
इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीने सामना संपल्यानंतर हातवारे करून सामन्यावरच प्रश्न उपस्थित केले. सामना संपल्यानंतर बराच वेळ इटलीची बॉक्सर रडत राहिली. ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात इतका जोरदार ठोसा मला कधीच जाणवला नाही. आता यावर आयओसीला निर्णय घ्यायचा आहे.