मुंबई: आयपीएल 2024 चा हंगाम सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले नव्हते, परंतु आता बोर्डाने पुढील वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होईल तर दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी त्याच शहरात खेळवला जाईल. त्याचवेळी पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
बीसीसीआयने पहिल्या टप्प्यासाठी 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्यातील पहिला सामना 22 मार्च रोजी झाला होता. IPL 2024 च्या पहिल्या टप्प्यातील अंतिम सामना 7 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, बोर्डाने पुढील वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल 2024 मध्ये सहभागी झालेल्या 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील सर्व संघांमध्ये प्रत्येकी एक सामना झाला.
The wait is finally over! ????
Here’s the complete TATA #IPL2024 schedule! Mark your calendars ???? and don’t miss out on the non-stop cricket excitement ????
Tune-in to #IPLOnStar, LIVE, Only on Star Sports pic.twitter.com/9XopOFs6ir
— Star Sports (@StarSportsIndia) March 25, 2024