लोणी काळभोर, (पुणे) : पुना कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स कॉमर्स कॅम्प पुणे द्वारा अझम कॅम्पस येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाने सिम्बायसिस कॉलेजला ४ विकेट ने पराभूत करत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे.
पुना कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स कॉमर्स कॅम्प पुणे द्वारा अझम कॅम्पस येथे आयोजित या स्पर्धेत एमआयटी एडीटी विद्यापीठ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. विद्यापीठाचे गोलंदाज अमित नागरगोजे, सचिन चाटे आणि गणेश लोहार यांनी अचुक मारा करत सिम्बायसिस कॉलेज संघाला ८ षटकात ८ बाद ६५ धावावर रोखले. यात गोलंदाज अमित नागरगोजे यांनी २ षटकात ११ धावा देत ३ खेळाडू बाद केले. यावेळी सिम्बायसिस कॉलेजने ८ षटकात फक्त ६६ धावाच करता आल्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कर्णधार लहु राठोड यांनी २० धावा, सचिन चाटे यांनी आक्रमक फलंदाजी करत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने १६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. फलंदाज महमंद शेख यांनी १७ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
संघाने ७.४ षटकात ६ बाद ६७ धावा करत विजयश्री मिळवला.
एमआयटी एडीटी संघात – कर्णधार लहु राठोड, उपकर्णधार अमित नागरगोजे, सचिन चाटे, संग्राम कुराडे, पवन कराड, महमंद शेख, सचिन नागरगोजे, दिपक नागरगोजे, राहुल चांदणे, गणेश जायगुडे, गणेश लोहार, शकील शेख, सोमनाथ विश्वासे, नेताजी थोरात यांचा समावेश होता.
दरम्यान, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सिरीजमधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचा गोलंदाज गणेश लोहार याला सन्मानित करण्यात आले. त्यांना मालिकेमध्ये एकूण 6 विकेट घेतल्या.
शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत विजय मिळविल्याबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, डॉ. रामचंद्र पुजेरी, स्कूलचे संचालक डॉ. विरेंद्र शेटे व डॉ. रजनीश कौर सचदेव यांनी अभिनंदन केले.
धावफलक – सामनावीर – अमित नागरगोज
सिम्बायसिस कॉलेज – ६५ धावा ८ बाद
अमित नागरगोज – २ षटकात ११ धावा ३ विकेट घेतले. महमंद शेख – १.१०.० , गणेश लोहार –१.३.१. राहुल चांदणे – २.२०.१, सचिन चाटे – २.१७.१