Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महाराष्ट्र केसरी’चा थरार रंगणार १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 December 2022, 10:10

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, काकासाहेब पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे, नवनाथ घुले, मेघराज कटके, दत्ता गायकवाड, संजय शेटे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात या कुस्त्या होतील.

रामदास तडस म्हणाले, “अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’चे हे ६५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. ४७ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.”

 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारीला होणार आहे. उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.

“कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

आखाडा, मैदानाचे उद्घाटन…
६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली आहे. ३० एकर जागेवर कुस्तीचा हा कुंभमेळा भरणार आहे. या मैदानाचे उद्घाटन मंगळवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुदळ मारून झाले. भव्य दिव्य स्वरुपात ही कुस्ती स्पर्धा होणार असून, माती व गादी विभागाचे आखाडे, ७० हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था येथे करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34
Next Post

स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; पिंपळे गुरव येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp