पॅरिस: आणखी एका भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला आहे. मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे. कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या 29 वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. हा खेळाडू 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि जेव्हा त्याला पॅरिसमध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने इतिहास रचला.
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
स्वपिनल कुसळेने 451.4 गुणांसह कांस्यपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेमबाजाला हरवून त्याने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा केवळ 7वा नेमबाज आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन नेमबाजांनी भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले, तिच्यासह सरबजोतनेही पदक जिंकले. आता स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.