Cricket News : कोलकाता : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी गुरुवारी अचानक क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मनोज तिवारीने स्वतःचा एक फोटो ट्विट करून धन्यवाद लिहिले.(Cricket News)
मनोज तिवारी यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
मनोज तिवारी यांनी सन २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मनोज तिवारी यांनी ‘टीम इंडिया’साठी १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वन डेमध्ये त्याने २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. ३७ वर्षीय तिवारीने सन २०१५ मध्ये ‘टीम इंडिया’साठी अखेरचा सामना खेळला होता.(Cricket News)
मनोज तिवारी सध्या बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडामंत्री आहे. त्याला गेल्या आठ वर्षांपासून ‘टीम इंडिया’मध्ये स्थान मिळालेले नाही. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळला होता. बंगालला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात तिवारीचा मोठा वाटा होता. मनोज तिवारीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.(Cricket News)
मनोज तिवारी यांनी लिहिले की, ‘क्रिकेटला अलविदा. या खेळाने मला सर्व काही दिले आहे. ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता तेही मला मिळाले. मी या खेळाचा आणि देवाचा सदैव ऋणी राहीन, जो नेहमी माझ्या पाठीशी असतो. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या लहानपणापासून ते गेल्या वर्षापर्यंत माझ्या सर्व प्रशिक्षकांचेही आभार. वडिलांसमान असलेले गुरू मानबेंद्र घोष यांचे मनोज तिवारीने विशेष आभार मानले.'(Cricket News)