मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ जुलै रोजी केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. तर, आजचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याकडे इंग्लंडचे लक्ष असेल.