पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. आज (२७ जुलै) या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होत आहे. मागील दोन सामन्यांप्रमाणे तिसरा सामनाही पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसरा सामना जिंकून यजमानांना ‘व्हाईट वॉश’ देण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर, हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजचा संघ करेल. यापूर्वीचे दोन्ही सामने रंगतदार झाले होते. त्यामुळे आजचा सामनाही रंगतदार होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने सावध सुरूवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने भारताला १६ षटकात ८४ धावांपर्यंत पोहचवले आहे. यावेळी शिखर धवन ४६ धावांवर तर शुभमन गिल ३५ धावांवर खेळत आहे.