Ind W vs Nz W : कालपासून महिलांच्या क्रिकेटच्या महाकुंभाला सुरूवात झाली असून आज टीम इंडिया पाहिल्या सामन्याने श्रीगणेशा करणार आहे. इंडियन वुमेन्स टीम आणि न्यूझीलंड वुमेन्स टीम यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमिफायनलपर्यंत पोहोचली होती. परंतु वर्ल्ड कप माटर्जींक्त आला नव्हता, आता मात्र थेट वर्ल्ड कप जिंकायचं स्वप्नं टीम इंडियाने बघितलं आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करणार? याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे.
विजयाचे पारडे कुणाच्या बाजूने..
टी ट्वेन्टीमध्ये वूमेन्स इंडियन टीम आणि न्यूझीलंड वूमेन्स टीम 13 वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यात भारत 4 वेळा जिंकला आहे तर न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार न्यूझीलंडचा संघ वरचढ असलेला दिसत आहे. अशातच आता हरमनप्रित कौर कोणती रणनीती आखणार आहे? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मैदान कशाला पोषक?
दुबईच्या मैदानावर खासकरून फास्टर बॉलर्सला अधिक मदत मिळत असते. फास्टर्स नवीन बॉलने आपली कमाल दाखवू शकतात. मात्र, नंतरच्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सला देखील मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टॉस कोणाच्या बाजूला जातो? हे महत्वाचा असणार आहे.
न्यूझीलंड (संभाव्य प्लेइन इलेव्हन) : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (C), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (WK), हॅना रोवे, जेस केर, लेह कॅस्परेक, ली ताहुहू.
टीम इंडिया (संभाव्य प्लेइन इलेव्हन) : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (C), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (WK), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर.