मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली असून फेब्रुवारी महिन्यात दुबई येथे होणाऱ्या डब्ल्यूटीए १००० स्पर्धेत ती शेवटचा सामना खेळणार आहे. हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे मला निर्णय घेण्यास भाग पडत असल्याचे सानिया मिर्झाने डब्ल्यूटीएच्या वेबसाईटशी बोलताना ही घोषणा केली.
भारताची आघाडीची व्यावसायिक टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीन वर्षात ती दुबई येथे होणाऱ्या डब्ल्यूटीए १००० स्पर्धेत खेळणार आहे. मात्र, ही स्पर्धा तिच्यासाठी शेवटची स्पर्धा असल्याचे सानियाने जाहीर केले आहे.
डबल्स प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकाविणारी सानिया मिर्झा सध्या हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीग्रस्त आहे. त्यामुळेच तिला युएस ओपन स्पर्धेत देखील सहभागी होता आले नव्हते. टेनिसमधील डबल्स या प्रकारात सानियाने ६ वेळा विजेतेपद पटकावले होते.
मी प्रामाणिकपणे सांगते, मला माझ्या अटी -शर्थींवर जगायला आणि खेळायला आवडते. मात्र झालेल्या जखमांमुळे व्यावसायिक टेनिसमधून बाहेर पडण्याची इच्छा नाही. त्यातून पुनरागमन करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यासाठी सातत्याने मी प्रशिक्षण घेत होते, असे सानिया मिर्झाने बोलताना सांगितले.
मागील वर्षीच विम्बल्डन स्पर्धेनंतर सानिया निवृत्ती घेणार होती. मात्र या स्पर्धेत मिक्स्ड डबल्सची उपांत्य फेरी गमावली होती. मात्र, हाताच्या कोपराला जखम झाल्याने निवृत्तीची घोषणा करण्याची योजना काही काळासाठी पुढे ढकलली, असे सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी सांगितले.
शोएब मलिक सोबत तलाक ?
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा व पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी पाच महिने एकमेकांना डेट केल्यानंतर सन २०१० मध्ये लग्न केले होते. त्यानंतर सन २०१८ मध्ये इजहान मिर्झा मलिक हा मुलगा झाला होता. मात्र गेल्या काही काळापासून पाकिस्तानी माध्यमातून सानिया व शोएब यांच्या तालाकच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या.